महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात सावकारीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - खासगी सावकार

येथील पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव (वय70) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने वडूज परिसरात खळबळ उडाली आहे.

satara farmer suicide
सोतोरो

By

Published : Feb 8, 2020, 10:59 PM IST

Updated : Feb 8, 2020, 11:28 PM IST

सातारा- येथील पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव (वय70) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने वडूज परिसरात खळबळ उडाली आहे. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह झाडावरून उतरवणार नसल्याचा पवित्रा पांडुरंग यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

साताऱयात सावकारकीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

हेही वाचा -'..या बाबतीत फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवले'

याबाबत तक्रार अर्जात असे नमूद केले होते की, संजय किसन जाधव, उर्फ भैय्या (रा.पुसेसावळी, ता.खटाव, जि.सातारा) यांच्याकडून चार लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्यावेळी विजयचे वडील पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचे चेक घेतले होते. सदर रक्कमेपैकी आजअखेर दोन लाख रुपये व मायनी अर्बन बँकेच्या चेकने दोन लाख 72 हजार रुपये दिलेले होते. असे मिळून चार लाख 72 हजार जाधव यांच्या खात्यामध्ये जमा करून घेतले. सदरची रक्कम देतेवेळी पांडुरंग यादव यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचा घेतलेला चेक संजय जाधव यांच्याकडेच आहेत. असे असतानाही संजय जाधव यांनी पांडुरंग यादव यांच्याकडून दमदाटीने वडूज येथील 0.4 हेक्टर क्षेत्राचा दस्ताऐवज करून घेतला आहे. मात्र, पैसे दिले नाहीत. पण दस्तामध्ये सदर मिळकतीची खरेदी किंमत 20 लाख 95 हजार दाखवण्यात आलेली आहे. तसेच संजय जाधव यांचा साथीदार किरण लोहारा (रा.पुसेसावळी, ता.खटाव, जि.सातारा) याच्याकडून संजय जाधव यांचे व्याजाचे पैसे देण्यासाठी किरण लोहारा यांच्याकडून 40 हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेऊन संजय जाधव यांचे व्याजाचे पैसे दिले. त्यानंतर आणखी रक्कम 75 हजार रुपये दिले. त्यानंतर लोहारा यांना वेळोवेळी व्याज देवून, 1 लाख रुपये एवढी रक्कम दिली आहे. तसेच माझ्याकडून सदर रक्कमेपोटी बँक ऑफ इंडियाचे कोरे सही केलेले दोन चेक त्यांनी घेतलेले आहेत. असे असताना लोहारा यांनी इनोव्हा गाडी (क्र.एमएच.02-ओएल-7362) दमदाटी करून घेऊन गेले असल्याची लेखी तक्रार मृत पांडुरंग यांचा मुलगा विजय यादव याने पोलीस ठाण्यात दिली होती.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव यांचा मुलगा विजय पांडुरंग यादव याने खासगी सावकाराकडून चार लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात खासगी सावकाराने साडेचार लाख रुपयांचा चेक घेतला होता. सावकाराच्या तगाद्याला कंटाळून यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वडूज पोलीस निरीक्षक यांच्याकडे सावकारीविरोधात तक्रारी अर्ज दिलेला होता. मात्र, यावर पोलिसांनी कोणतीही दखल अथवा कारवाई न केल्याने आणि सावकारांच्या तगादा मागे लागल्याने पांडुरंग यादव यांनी शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास पेडगाव रोड येथील विठ्ठलनगर परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा -हिंदूंसाठी कायदे आणि अल्पसंख्याकांसाठी फायदे, हिंदू जनजागृती समितीचा आरोप

घटनास्थळावर त्यांच्या कुटुंबातील मुलगा व नातेवाईक यांनी आक्रोश करत आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी व पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांच्यावर आणि खासगी सावकार संजय किसन जाधव (रा. पुसेसावळी), त्याचा साथीदार किरण लोहारा ( रा. पुसेसावळी) आदींच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यत आत्महत्या केलेला मृतदेह झाडापासून काढण्यास त्यांनी विरोध केला. त्यामुळे घटनास्थळावर मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Last Updated : Feb 8, 2020, 11:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details