सातारा- जिल्ह्यात आज सकाळी आणि बुधवारी दिवसभरात 78.97 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 6.77 मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
सातारा जिल्ह्यात सरासरी पाऊस; शेतकरी सुखावला
सातारा जिल्ह्यात सरासरी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा- 13.53 (286.66) मिमी, जावळी - 9.45 (307.87) मिमी, पाटण-12.91 (226.06) मिमी, कराड-6.85 (157.54)मिमी, कोरेगाव-2.0 (149.44) मिमी, खटाव-0.87 (90.80) मिमी, माण-0 (63.41) मिमी, फलटण- 0 (58.33) मिमी, खंडाळा - 0.55 (95.10 ) मिमी, वाई - 2.31 (139.41) मिमी, महाबळेश्वर-30.50 (1030.83) आजपर्यंत एकूण 2605.46 मिमी तर सरासरी 202.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सायंकाळीदेखील दुष्काळी माण, खटाव तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे.