सातारा गणेशोत्सवात सातारा एसटी विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या ११ आगारांमधून ११५ बसेसची सोय करण्यात आली Facility of buses from in Satara agar आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे.
फेर्याही वाढवल्यागणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात येणार्या तसेच कोकणात जाणार्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे सातारा विभागातील सर्व आगारातून पुणे व मुंबई या ठिकाणी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी सांगितले. सातारा आगारातून सातारा-स्वारगेट मार्गावर रोज ४६ फे्र्या होतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणखी 30 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच मुंबई व बोरिवलीसाठी २० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले. सातारा आगारातून मुंबई, ठाणे, पालघर आगाराच्या सुमारे २० बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर मार्गावर धावणार आहेत.