सातारा -कोयना धरण परिसर सोमवारी सकाळी ६.४५ च्या दरम्यान भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ एवढी नोंदवली गेली आहे. तर केंद्रबिंदु कोयणा धरणापासून ८ किलोमीटरवर असलेल्या गोषटवाडी गाव परिसरात होता.
आज सकाळच्या सुमारास कोयणा धरण परिसर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. कोयना धरणापासून पश्चिमेकडे असलेल्या गोषटवाडी गावाच्या परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती. कोयना धरण परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या परिसरात लहान-मोठ्या भूकंपांची मालिका सुरू असते. पाटण, कोयनानगर आणि चिपळूण तालुक्यातील अलोरे, पोफळी परिसरात हा धक्का जाणवला आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोठेही हानी झालेली नाही.