महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 15, 2021, 3:32 PM IST

ETV Bharat / state

कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी राज्यमंत्र्याला घरपोच केले; डॉ. अतुल भोसलेंची विश्वजीत कदमांवर टीका

मताचा अधिकार नसताना प्रचारासाठी तळ ठोकलेल्या राज्यमंत्र्याला कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी घरपोच करून त्यांचे मनसुबे उधळून लावल्याची टीका डॉ. अतुल भोसले यांनी विश्वजीत कदम यांचे नाव न घेता केली आहे.

डॉ. अतुल भोसलेंची विश्वजीत कदमांवर टीका
डॉ. अतुल भोसलेंची विश्वजीत कदमांवर टीका

कराड (सातारा)- मताचा अधिकार नसताना प्रचारासाठी तळ ठोकलेल्या राज्यमंत्र्याला कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी घरपोच करून त्यांचे मनसुबे उधळून लावल्याची टीका डॉ. अतुल भोसले यांनी विश्वजीत कदम यांचे नाव न घेता केली आहे.

कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी राज्यमंत्र्याला घरपोच केले; डॉ. अतुल भोसलेंची विश्वजीत कदमांवर टीका

कृष्णा कारखाना निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने 21.0 असा निर्विवाद विजय मिळविला. सोमवारी कारखान्याच्या चेअरमनपदी पुन्हा डॉ. सुरेश भोसले आणि व्हाईस चेअरमनपदी जगदीश जगताप यांची एकमताने निवड झाली. यावेळी बोलताना डॉ. अतुल भोसले यांनी ना. विश्वजीत कदम यांचा समाचार घेतला.

'मोफत साखर घरपोच देण्याचे आश्वासन दिवाळीपूर्वी पूर्ण करेन!'

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत एका राज्यमंत्र्याने सत्तेचा व पैशांचा अहंकार दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून डॉ. अतुल भोसले म्हणाले, ज्याप्रमाणे 40 हजार एकरवाल्या विजय मल्ल्याची अवस्था झाली. तशीच अवस्था या 400 एकरवाल्या राज्यमंत्र्याची कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी केली. मताचा अधिकार नसताना हा मंत्री 15 दिवस निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत होता. त्यांच्या उमेदवारांना अवघी 4,500 मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत सभासदांनी एका अर्थाने सत्तेचा व पैशाचा अहंकार धूडकावून लावत राज्यमंत्र्यांना घरपोच केल्याची खरमरीत टीकाही ना. विश्वजीत कदम यांचे नाव न घेता केली. सभासदांना मोफत साखर घरपोच देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. त्याची दिवाळीपूर्वीच अंमलबजावणी करून प्रत्येक सभासदाला मोफत साखर घरपोच केली जाईल, अशी ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

काय म्हणाले होते विश्वजीत कदम?

कृष्णा कारखाना निवडणुकीच्या प्रचारात सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवर घणाघाती टीका केली होती. हा ट्रस्ट म्हणजे पुण्याच्या एका चौकातील टपरीएवढा आहे. 400 एकरातील ट्रस्टच्या बाता मारू नका. भारती विद्यापीठ 4 हजार एकरात आहे, असा इशारा ना. कदम यांनी प्रचारात दिला होता. डॉ. अतुल भोसले यांनी देखील विश्वजीत कदम यांच्या टीकेला विजय मल्ल्याचे उदाहरण देत जोरदार प्रत्त्युत्तर दिले.

हेही वाचा- महाविकास आघाडीचा 'रिमोट कंट्रोल' शरद पवारांजवळ ; नाना पटोलेंचा पुनरुच्चार

ABOUT THE AUTHOR

...view details