महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केरळमध्ये नवीन प्रजातीच्या पालीचा शोध; साताऱ्यातील संशोधक डॉ.अमित सय्यद यांचे यश - lizard research news

या पालीचे 'निमस्पिस पलक्काडंसिस' असे नामकरण करण्यात आले. केरळच्या पलक्काडमधील एका जंगलात ही पाल आढळली.

species of lizard
केरळमध्ये नवीन प्रजातीच्या पालीचा शोध

By

Published : Sep 12, 2020, 8:52 PM IST

सातारा - येथील 'वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी' या संस्थेचे प्रमुख डॉ. अमित सय्यद यांनी केरळमधून एका नवीन प्रजातीच्या पालीचा शोध लावला आहे. अमेरिकेतील अँफिबिया अँड रेप्टिलिया या जागतिक रिसर्च जर्नलने संशोधन अहवाल प्रकाशित करून मान्यतेची मोहर उमटवली आहे.

वन्यजीव संशोधक डॉ. अमित सय्यद

ही पाल दिसायला अतिशय सुंदर असून तिच्या पाठीवर तपकिरी व काळ्या रंगाची नक्षी आहे. तिच्या जबड्याखालील भाग हा गडद केशरी असून, पोटाकडची बाजू पांढरी आहे. या पालीचे 'निमस्पिस पलक्काडंसिस' असे नामकरण करण्यात आले. केरळच्या पलक्कडमधील एका जंगलात ही पाल आढळली. मे 2019 मध्ये केरळच्या या जंगलात वन्यजीव अभ्यासासाठी 'डबल्यूएलपीआरएस' या संस्थेची टीम गेली होती. त्यात डॉ. सय्यद यांचा समावेश होता. या अभ्यास दौऱयात ही पाल आढळली.

ही पाल अगदी 'निमास्पिस लिटोरोलीस' या पालीसारखी दिसत असल्याने आजपर्यंत तिला याच नावाने ओळखले जात होते. निमास्पिस लिटोरोलीस ही भारतातील पश्चिम घाटात केरळमध्ये आढळणारी पाल आहे. ही 1853 साली जर्डन नामक ब्रिटिश संशोधकाने मलबार केरळमधून नोंद केली होती. डॉ. अमित सय्यद हे गेली ९ वर्षे विशेषतः याच कुळातील पालींचा अभ्यास करत असल्यामुळे त्यांना भारतातील विविध जंगलांमध्ये तसेच अंदमान- निकोबार या जंगलांमध्ये विविध सर्प तसेच या कुळातील पालींच्या अभ्यासासाठी सतत जावे लागते.

२०१९ मध्ये या नवीन पालीची शोध मोहीम सुरू झाली व एका वर्षाच्या अथक प्रयत्नाने या पालीला नवी ओळख देण्यात त्यांना यश आले. डॉ. अमित सय्यद यांनी ७ पाली, एक विंचू, एक बेडूक अशा आजपर्यंत ९ नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. नव्या पालीच्या शोध मोहिमेत विवेक फिलिपिन्स , रवींद्रन दिलीपकुमार तसेच डॉ.विवेक विद्यनाथन, अभिजीत नाळे, महेश बंडगर, किरण अहिरे, विकास जगताप तसेच त्यांच्या चिमुकल्या आयान (वय 9 वर्षे ) व मासुम (10 वर्षे ) यांनीही रिसर्च लॅबमध्ये मदत करून मोलाचा वाटा उचलला असल्याचे डॉ. सय्यद यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details