सातारा- सातारा स्वातंत्र्यसंग्रामा दरम्यान गांधीजींनी पाचगणी शहराला भेट दिली होती. तेव्हा ते आत्ताचे भाई भवन (आत्ताचे नाव) या ठिकाणी राहत होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते मंडळी देखील पाचगणीला यायचे. या ठिकाणी महात्मा गांधी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र त्यातून ते बचावले.
महात्मा गांधीजी रोज सकाळी चालत पंचगणी येथील बाथा हायस्कूलमध्ये प्रार्थना घेत होते. तसेच या ठिकाणी ते आपल्या अनेक राजकीय नेते तसेच मित्रांना भेट देत होते. मात्र या ठिकाणी सध्या अनेक आठवणी जाग्या होत असल्या, तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्यामुळे पुढच्या पिढीला येथील महात्मा गांधीविषयी ऐतिहासिक गोष्टी कितपत आठवतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी येथे गांधीजींची जयंती आणि पुण्यतिथीला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करून बापूंच्या आठवणीला उजाळा दिला जातो.