सातारा(कराड) -शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्ड बंद करणार असल्याचे विभागीय आयुक्त मिलींद म्हैसेकर यांनी जाहीर केले. या उपजिल्हा रूग्णालयात फक्त कोरोनाची लक्षणे नसणाऱ्यांवर उपचार केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कराड उपजिल्हा रूग्णालयात कोरोनावरील उपचार बंद; विभागीय आयुक्त मिलींद म्हैसेकर यांची माहिती
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या सोयीसाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आता मात्र, उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्ड बंद करणार असल्याचे विभागीय आयुक्त मिलींद म्हैसेकर यांनी जाहीर केले.
कराड उपजिल्हा रूग्णालय
या अगोदर कराड उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार केले जाय होते. हे रूग्णालय कराडच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या रूग्णालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण पसरले. उपजिल्हा रूग्णालय नॉन कोविड करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्त मिलींद म्हैसेकर यांनी कोरोना वॉर्ड बंद केल्याची घोषणा केली.