कराड (सातारा) - लॉकडाऊनमुळे दुधाअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घरपोच दूध पुरवठा सुरू करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. या निर्णयामुळे कराड, मलकापूरसह तेरा गावांमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कराड, मलकापूरकरांना दिलासा... घरपोच दूध देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - कोरोना
कोरोना संक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराड, मलकापूर शहरांसह आजुबाजूच्या तेरा गावांमध्ये बुधवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. रुग्णालये वगळता कोणत्याही प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत, असे प्रशासकीय आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात आला. लॉकडाऊनची कडेकोट अंमलबजावणी झाली असली तरी दूध पुरवठा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.

दूध पुरवठ्याबाबतची समस्या लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत शुक्रवारी घरपोच दूध सेवेला परवानगी दिली. इन्सिडंट कमांडर म्हणून कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजपासून सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत नागरिकांना घरपोहच दुधाचा पुरवठा करण्यात येणार आहे. कोयना दूध संघ हा कराड, मलकापूरमधील प्रमुख वितरकाकडे दूध पोहच करणार आहे. वितरक ते दूध नागरिकांना घरपोच करणार आहेत.