सातारा -एसटीमध्ये बसण्याच्या कारणावरून महाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटात पूर्वी झालेल्या वादाचे पर्यवसान मंगळवारी सायंकाळी हाणामारीत झाले. कराडमधील बस थांब्यावर ही घटना घडली. दोन्ही गट हॉकी स्टीक आणि काठ्या घेऊन एकमेकांना भिडले. मात्र, पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद झालेली नव्हती.
एसटीमध्ये बसण्याच्या वाद, तरुणींच्या दोन गटात काठ्यांनी हाणामारी - karad satara dispure
कराडच्या विद्यानगर परिसरातील एका महाविद्यालयातील तरुणींमध्ये काही दिवसांपूर्वी बसमध्ये बसण्यावरून वाद झाला होता. मंगळवारी एसटी थांब्यावरच पुन्हा त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर तरुणींचे दोन गट एकमेकांना भिडले. एकमेकींना शिवीगाळ करत त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली. एका गटातील तरुणींच्या हातामध्ये चक्क काठ्या आणि हॉकी स्टीक होत्या.
कराडच्या विद्यानगर परिसरातील एका महाविद्यालयातील तरुणींमध्ये काही दिवसांपूर्वी बसमध्ये बसण्यावरून वाद झाला होता. मंगळवारी एसटी थांब्यावरच पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर तरुणींचे दोन गट एकमेकांना भिडले. एकमेकींना शिवीगाळ करत त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली. एका गटातील तरुणींच्या हातामध्ये चक्क काठ्या आणि हॉकी स्टीक होत्या. तरुणींच्या दोन गटामध्ये हाणामारी सुरू झाल्याचे समजताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच एका गटाने घटनास्थळावरून पोबारा केला, तर दुसऱ्या गटातील ५ ते ६ तरुणींना पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशीरापर्यंत कुठलीही तक्रार नोंद झाली नव्हती. मात्र, मुलींच्या दोन गटातील राड्याची जोरदार चर्चा विद्यानगरमध्ये होती.