महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा; विभागीय आयुक्तांची सूचना

सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी कराड येथे आढावा बैठक घेतली. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून रूग्ण वाढू नयेत, यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यांनी केल्या.

By

Published : May 11, 2020, 9:53 AM IST

Updated : May 11, 2020, 2:43 PM IST

dr. deepak mhaisekar
डॉ. दीपक म्हैसेकर

कराड (सातारा)- सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. परंतु, मृत्युचे प्रमाण खूपच कमी आहे, ही त्यातील समाधानाची बाब आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून रूग्ण वाढू नयेत, यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली.

साताऱ्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेताना डॉ.दीपक म्हैसेकर

कराड येथील विश्रामगृहात कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन करत असलेल्या कामाचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्हाधिकारी हे लॉकडाऊनमध्ये सुट देत आहेत, असे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले. शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बाजारपेठेंबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील. जिल्हा प्रशासन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काम करत आहे. नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजूरी द्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्तांनी दिली.

गंभीर आजार असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये. कोरोना विषाणूवर खात्रीशीर असे औषध नसले तरी अन्य उपाययोजनांद्वारे विषाणूचे संक्रमण टाळता येऊ शकते. वैयक्तिक व कौटूंबिक सुरक्षिततेसाठी मोबाईलवर आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

Last Updated : May 11, 2020, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details