सातारा : शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 50 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे पाणी साठा वेगाने वाढत आहे.. सध्या धरणात 51.93 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे, तर धरणात प्रतिसेकंद 59 हजार 851 क्युसेक इतकी आवक सुरू आहे. चोवीस तासात 4 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.
त्यामुळे कोयना धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. सध्या प्रतिसेकंद 60 हजार क्युसेक इतकी आवक सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पाणीसाठ्यात तब्बल 4 टीएमसीने वाढ झाली आहे. तसेच पाण्याची आवक 10 हजार क्युसेकने वाढली आहे.
चोवीस तासात नवजा येथे २०१ मिलीमीटर, महाबळेश्वरमध्ये १८५ आणि कोयनानगर येथे १५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. जूनमध्ये पाण्याने गाठला होता तळकोयना धरणात दि. 18 जून रोजी केवळ 10.66 टीएमसी इतका पाणीसाठा होता. त्यातील 5.66 इतकाच उपयुक्त पाणीसाठा होता. धरणातील पाण्याने तळ गाठला होता. धरणातील जुने अवशेष उघडे पडले होते. सगळीकडे गाळ पाहायला मिळत होता.
यापुर्वी 26 जून 2019 रोजी पाणीसाठ्याने तळ गाठला होता. त्यावेळी धरणात केवळ 10.75 टीएमसी एवढा निच्चांकी पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर चार वर्षांनी तशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र जुलैच्या मध्यापासून पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत गेली. पश्चिम भागात दरडी कोसळल्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी घाट क्षेत्रातून प्रवास टाळण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.
दरड आणि दगड हटविण्यासाठी यवतेश्वर-कास रस्ता बंद राहणार आहे. महाबळेश्वर, जावली, वाई, सातारा आणि पाटण तालुक्यातील डोंगरी भागात अनेक रस्त्यांवर दरडी कोसळल्या आहेत. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Heavy Rains In Satara : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने घेतला 'हा' मोठा निर्णय
- Heavy Rains In Satara : आंबेनळी, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर आले पुराचे पाणी