सातारा- कराड तालुक्यातील 35 वर्षीय कोरोना बाधित तरुण कोरोनामुक्त झाला आहे. कराडमधील कृष्णा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तो दाखल होता. त्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आज त्याला घरी सोडण्यात येणार आहे.
दिलासादायक ! कोरोना बाधित तरुण झाला कोरोनामुक्त, आज होणार रुग्णालयातून सुट्टी - सातारा
मुंबईतून घरी परतलेला तरुण कोरोना बाधित असल्याने खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.
हा तरुण मुंबईहून आल्यानंतर कोरोना बाधित म्हणून त्यास १४ दिवसांपूर्वी येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ दिवसानंतर पुन्हा त्याची टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये हा कारोना बाधित रुग्ण निगेटिव्ह आला आहे. तो पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या ११ होती. यापूर्वी एका महिला रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला होता. ती महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाल्याने तिला सोडण्यात आले होते. कोरोनामुक्त झालेला हा सातारा जिल्ह्यातील दुसरा रुग्ण आहे.