कराड - राज्यात काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव घेऊन आली, तर आम्ही हा प्रस्ताव आपल्या पक्षश्रेष्टींसमोर ठेवू आणि मित्रपक्षांशीही चर्चा करू, असे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. तर सेनेकडून असा कोणताही प्रस्ताव अद्याप आला नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलताना हेही वाचा -'पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव कमी पडला'
दरम्यान, आज सेना-भाजप यांची बैठक होणार होती, ती रद्द झाली. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी 50-50 अशी चर्चाच झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे, तर मुख्यमंत्र्यांनीही मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार, असे सांगितल्यामुळे राज्यात नवीन समीकरण जुळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेनेसोबत युतीविषयी बोलताना शिवसेनेची आणि आमची विचारसरणी वेगळी आहे. मात्र,, एकत्र यायच असेल तर शिवसेना भाजपपेक्षा बरी. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का नाही? याबाबत विरोधीपक्ष नक्कीच विचार करतील, असे यापूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. त्यामुळे यानंतर आता कोण सरकार स्थापन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - पुन्हा 'त्या'च कंत्राटदाराला विहार तलावाचे काम; मुंबई मनपाचा अजब निर्णय
आदित्यजी ‘हीच ती वेळ’ संधी दवडू नका -
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही’ असा सल्ला फेसबुक पोस्टद्वारे दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचा शिवसेनाला पाठिंबा देण्याचे संकेत वारंवार मिळत आहेत. त्यामुळे आता राज्यात शिवसेना-काँग्रेस सरकार स्थापन होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.