सातारा- शहरातील एका विवाहितेने स्वत:च्या १५ वर्षीय अल्पवयीन मावस दिराला शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. जाणून-बुजून धक्का मारल्याचे घरात सांगेन, अशी धमकी देत तिने दिराला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले असल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणी विवाहित महिलेविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित १५ वर्षीय मुलगा यात्रेनिमित्त आपल्या मावशीच्या गावात आला होता. यात्रेत संशयित आरोपी महिलेला मुलाचा धक्का लागला. याच कारणातून संशयित आरोपी महिलेने घरी आल्यानंतर ‘भावोजी, तुम्ही मला जाणून-बुजून धक्का मारला, मी तुमच्या दादाला सांगते,’ असे म्हणत दमदाटी केली आणि घाबरलेल्या मुलाला आरोपी महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. शरीरसंबंध झाल्यानंतर संशयित महिलेने त्याची वाच्यता न करण्याची धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा संशयित आरोपी महिलेने पीडित मुलाला संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले.