सातारा - कोरोना बाधित रुग्णासह ११ लोकांना एकत्र आणून राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड येथील दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संजय रघुनाथ निकम आणि सुनिल रघुनाथ निकम (रा.साकुर्डी, ता.कराड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी भाच्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये स्वत:च्या कुटुंबातील ८ लोक, भाचा, त्याची पत्नी आणि तांबवे (ता. कराड) येथील कोरनाबाधित व्यक्तिने सहभाग घेतला होता.
डोहाळे जेवण घालणाऱ्या कोरोना रुग्णाच्या दोन मामांवर राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये गुन्हा दाखल - सातारो पोलीस
संजय रघुनाथ निकम आणि सुनिल रघुनाथ निकम यांनी २६ मार्चला साकुर्डी येथील आपल्या घरात भाच्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमासाठी ११ लोकांना एकत्रित करुन त्यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांवर कारवाई करण्यात आली.
संजय रघुनाथ निकम आणि सुनिल रघुनाथ निकम यांनी २६ मार्चला साकुर्डी येथील आपल्या घरात भाच्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमासाठी ११ लोकांना एकत्रित करुन त्यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. कोरोना विषाणुचा संसर्ग पसरवण्यासाठीची घातकी कृती केल्याची फिर्याद तलाठ्याने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
त्यावरून राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोरोना बाधित रूग्णाच्या दोन्ही मामांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पानवळ हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.