सातारा -सातारा जिल्ह्यातील माण तालुका सोडून सर्व माध्यमिक शाळांना व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी प्रशासनाकडून मंगळवार दिनांक ६ ऑगस्टला सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ही माहिती दिली आहे.
साताऱ्यात माण तालुका सोडून सर्व शाळांना व महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी
हवामान खात्याकडून साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका सोडून सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी प्रशासनाकडून मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान खात्याने मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सातारा जिल्ह्यातील माण तालुका सोडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून असे आदेश काढण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.
जिल्ह्यात पूर परिसस्थिती गंभीर बनली आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी उद्या मंगळवार सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.