सातारा :पाटण तालुक्यातील मरळी येथे शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, असे म्हटले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळे दिवाने झालेत. परंतु, एका राज्याच्या निवडणुकीवरुन इतर निवडणुकांची तुलना करत येत नाही. पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनाच सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray: 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना', स्वत:च्या जळत्या घराकडे लक्ष द्या- मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळे वेडे झाले आहेत. परंतु, दुसऱ्याचे घर जळतेय म्हणून आनंद व्यक्त करणाऱ्यांनी स्वत:च्या जळत्या घराकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
भारत जोडोचा परिणाम नाही :कर्नाटकात काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणे निश्चित मानले जात आहे. याबाबत विविध विरोधी पक्षांचे नेते काँग्रेसच्या विजयामुळे भाजपवर हल्लाबोल करत आहेत.
राहुल गांधीची 'भारत जोडो' यात्रा सुरु असतानाही मेघालय, त्रिपुरा येथे भाजपची सत्ता आली. त्यामुळे कर्नाटकच्या निवडणुकीचा देशावर परिणाम होईल, असे अनुमान काढून विरोधक स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रात काहाही परिणाम होणार नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2024 च्या निवडणुकीच्या विजयाची सुरुवात : कर्नाटक निवडणुकीतील भाजपच्या पराभवावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, देशातील एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा पराभव कर्नाटक निवडणुकीपासून झाला आहे. कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा आणि आशेचा नवा किरण दाखवला आहे. हिंदू मुस्लीम, बजरंगबली, हिजाब हे भाजपचे धार्मिक मुद्दे कर्नाटक निवडणुकीत चालले नाही. जिथे काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर आणि प्रश्नांवर निवडणूक लढवली आणि जिंकली. 2024 च्या निवडणुकीच्या विजयाची ही सुरुवात आहे.
- हेही वाचा : Karnataka Assembly Elections: कर्नाटकने दाखवून दिले लक्ष विचलित करणारे राजकारण चालणार नाही -प्रियंका गांधी
- हेही वाचा : Devendra Fadnavis On Karnataka Result : म्हणून आम्ही कर्नाटकात हरलो, फडणवीसांनी सांगितले भाजपच्या पराभवाचे कारण
- हेही वाचा : Uddhav Thackeray On Karnataka Result : कर्नाटकात सामान्य माणसाकडून हुकूमशाहीचा पराभव - उद्धव ठाकरे