सातारा - ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून वैदवी अमोल पवार ही अडीच वर्षांची चिमुरडी जागीच ठार झाली. गोटे (ता. कराड) येथील वीटभट्टी परिसरात मुले खेळत असताना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून अडीच वर्षांची चिमुरडी जागीच ठार - अपघात न्यूज
वीटभट्टी परिसरात लहान मुले खेळत होती. खेळताना ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्याने वैदवी ही ट्रॉलीच्या चाकाखाली सापडली. तिच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली.
वीटभट्टी परिसरात लहान मुले खेळत होती. खेळताना ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्याने वैदवी ही ट्रॉलीच्या चाकाखाली सापडली. तिच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. वैदवीचे वडील अमोल पवार हे मूळचे सातारा येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपासून ते गोटे येथे वीटभट्टीवर काम करत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, अपघात विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल खलील इनामदार यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.