महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'उदयनराजेंच्या दहशतीला घाबरुन शरद पवारांनी त्यांना लोकसभेची दिली उमेदवारी' - Narendra Patil

सातारा लोकसभा मतदारसंघात गुप्त सर्वे करण्यात आला.  त्यामध्ये उदयनराजे तुम्हाला आवडतात का ? असे विचारले तर नाही म्हणून उत्तर आल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील

By

Published : Apr 13, 2019, 2:31 AM IST

Updated : Apr 13, 2019, 7:33 AM IST

सातारा -शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या दहशतीला घाबरुन त्यांना उमेदवारी दिल्याचे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पवारांनी मनापासून उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व त्यांचे उमेदवार उदयनराजे या दोघांवरही निशाणा साधला. शिवसेना-भाजपच्या महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील

सातारा लोकसभेच्या मतदारसंघात गुप्त सर्वे करण्यात आला. त्यामध्ये उदयनराजे तुम्हाला आवडतात का ? असे विचारले तर नाही म्हणून उत्तर आले. पण खुला सर्वे केला असता त्यांच्या दहशतीमुळे नागरिक हात वर करतात. उदयनराजेंची एवढी दहशत आहे की, कोणीही हात वर करणार नाही. शरद पवारही त्यांना घाबरले आहेत. अशा माणसाला हरवायचे असेल तर गुप्त मतदानाची जागृती करायला हवी. ही जागृती दोन ते तीन लाख लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असा त्यांनी राजकीय फॉर्म्युला सांगितला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील उपस्थित होते.

Last Updated : Apr 13, 2019, 7:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details