महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी - उदयनराजेंनी मानले जितेंद्र सिंह यांचे आभार

Voluntary Holiday On Shiv Jayanti २०२४ : केंद्रीय कर्मचारी म्हणून महाराष्ट्रा बाहेर कार्यरत असणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांना आता शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी मिळणार आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तसेच केंद्र सरकारच्या सुट्टीच्या परिशिष्ट सूचीमध्ये शिवजयंतीचा (१९ फेब्रुवारी) समावेश करण्यात आला आहे.

Voluntary Holiday On Shiv Jayanti
उदयनराजेंनी मानले जितेंद्र सिंह यांचे आभार

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 10:38 PM IST

सातारा Voluntary Holiday On Shiv Jayanti २०२४ :ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा (शिवजयंती) समावेश केल्याबद्दल साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी (Shiv Jayanti Celebrations Maharashtra) केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी घेता येणार आहे.


वर्षातून मिळणार दोन ऐच्छिक सुट्ट्या:केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दुसर्‍या परिशिष्ट सूचीमध्येही ऐच्छिक रजा मिळणार आहेत. परिशिष्टाच्या दुसऱ्या यादीतील सुट्ट्यांना प्रतिबंधित सुट्ट्या म्हणतात. महाराष्ट्राबाहेर कार्यरत असलेल्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंती साजरी करता यावी, म्हणून या यादीत शिवजयंतीच्या सुट्टीचा समावेश करावा, अशी लोक भावना उदयनराजेंनी मांडली होती. त्यानुसार केंद्र सरकारने ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा समावेश केला आहे.


छत्रपतींचा एकेरी उल्लेख दुरूस्त करणार:ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा उल्लेख चुकून ‘शिवाजी जयंती’ असा झाला आहे. त्याऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’, असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ती तात्काळ मान्य करून छत्रपतींचा आदरार्थी उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही दिली.


भूकंप संशोधन केंद्राच्या मुद्द्यावर चर्चा:जितेंद्र सिंह यांच्याकडे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यांचाही अतिरिक्त कार्यभार आहे. त्या विभागाशी संबंधित अनेक विषयांवर उदयनराजेंनी चर्चा केली. कराड तालुक्यातील हजारमाची येथे ६०० कोटी रुपये खर्चून भूकंप संशोधन केंद्र आणि अभ्यास विद्यापीठ उभारण्यात येत आहे. संशोधन केंद्राच्या अनुषंगाने देखील त्यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

10 वर्षांनी जनगणना झालीच पाहिजे: मराठा आरक्षणासाठी शहाजी दांडगे तसंच ज्ञानेश्वर गुंड (पंढरपूर) या दोन मराठा तरुणांनी स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र, 8 नोव्हेंबर, 2023 रोजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिलंय. यावेळी उदयनराजे भोसलेंनी त्यांच्या तळमळीचं कौतुक केलंय. तसंच दर दहा वर्षांनी जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. जोपर्यंत जनगणना होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी सरकारला सुनावलं होतं.

तेढ निर्माण केल्यास उद्रेक होणारच: आज या तरुणांनी रक्तानं पत्र लिहिलं आहे. समाजात तेढ निर्माण केल्यास उद्रेक होणारच असं मत भोसले यांनी यावेळी मांडलं. आरक्षण प्रश्नाचं राजकारण करत असला तर मग जनगणना होत नाही, तोपर्यंत निवडणुकही घेऊ नका. सगळ्या जातीतील लोकांना न्याय द्या. केवळ एक विशिष्ट जात पकडून चालू नका, असा सल्लाही उदयनराजेंनी राज्य सरकारला दिलाय.

हेही वाचा:

  1. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू; झोपेत असताना केला हल्ला
  2. दादा मोठे नेते, मी फार लहान कार्यकर्ता, त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही - अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
  3. एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री राजीनामा देणार? पुढील 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री कोण?

ABOUT THE AUTHOR

...view details