सातारा - सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारुन खटाव, कोरेगाव तालुक्यातील माळरान परिसरात बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. त्याविरोधात पुसेगाव पोलिसांनी काही जणांवर कारवाई केली. बैलगाडा शर्यतींच्या ठिकाणांवरुन काही वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. एकाच वेळी दोन शर्यतींवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या फँन्सी नंबरच्या आलिशान गाड्या आणि त्यांचे मालक कसे सापडले नाहीत..? गुन्हे फक्त सर्वसामान्य लोकांवरती का..? हा सगळा प्रकार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यातच कसा घडतो..? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
साताऱ्यात बैलगाडा शर्यंतीवर लाखोंचा पाऊस; पोलिसांची कारवाई की दिखावा? - bullock cart race in satara
सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारुन खटाव, कोरेगाव तालुक्यातील माळरान परिसरात बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतींचे बेकायदेशीर आयोजन केले जाते. लॉकडाऊनच्या काळात एका ठिकाणी हजारो लोक एकत्र जमा होतात आणि प्रशासनाला खबर लागत नसले, तर कोरोनाचा प्रसार कसा आटोक्यात आणणार, असा प्रश्न उपस्थितीत केला जाता आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱयांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
कोरेगाव व खटाव तालुक्यातील माळरान परिसरात हुसेनपूर आणि धारपूडी, बुध, गुजरवाडी या ठिकाणी तीन महिन्यांपासून बैलगाडा शर्यत भरत आहेत. या शर्यतींचे बेकायदेशीर आयोजन केले जाते. या शर्यतीमध्ये लाखो रुपयांचा सट्टा लागतो तर जिंकणार हजारो रुपयांची हवेत उधळपट्टी करतो आणि नागरिक चेंगराचेंगरी करत ते गोळा करतात. लॉकडाऊनच्या काळात एका ठिकाणी हजारो लोक एकत्र जमा होतात आणि प्रशासनाला खबर लागत नसले, तर कोरोनाचा प्रसार कसा आटोक्यात आणणार, असा प्रश्न उपस्थितीत केला जाता आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱयांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
कोरेगाव, खटाव तालुक्यातील अनेक गावांमधील माळरानावर बेकायदेशीर बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. पुणे, मुंबईवरुन आलेले लोक अशा शर्यती आयोजित करत असल्याचेही समोर येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अशा शर्यतींचे आयोजन धोकादायक ठरणार आहे. यामुळे सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते काय निर्णय घेणार, संबंधित अधिकारी वर्गाची चौकशी होणार का..? की त्यांना पाठीशी घातले जाणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.