सातारा - खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडाळ्याच्या घाटाच्या तोंडाजवळ, एका निर्जनस्थळी पोलिसांना एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये होता. महामार्गालगत हा मृतदेह पडला होता.
मृताची ओळख पटली नाही -

पुणे बंगळूर महामार्गावर खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार निदर्शनास आला. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. मृत महिलेच्या बोटांमध्ये अंगठ्या असून डाव्या हातावरती काहीतरी गोंदलेली खूण आहे. मृतांच्या अंगावरील काही कपडे जळलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाबाबत आवश्यक सूचना केल्या. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार आहे. मृत महिलेचे वय अंदाजे बावीस ते अठ्ठावीस असू शकते, असे धीरज पाटील यांनी सांगितले.
मृत महिलेची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान -
अज्ञातांविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटवणे आणि त्यानंतर संशयितांचा शोध घेणे हे पोलिसांपुढे आव्हान आहे.