महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सायरन वाजवित येणारी गाडी कचर्‍याच्या घंटागाडीसारखी ; अतुल भोसलेंच्या राज्यमंत्रीपदाची खिल्ली

रेठरे गावात सायरन वाजवत गाडी आली की आम्हाला ग्रामपंचायतीची कऱ्याची घंटागाडी आल्यासारखे वाटते, अशी अविनाश मोहिते यांनी अतुल भोसले यांच्यावर केली. ते आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत रेठले बुद्रुक येथे बोलत होते.

सातरा जिल्ह्यातील महाआघाडीची सभा

By

Published : Oct 16, 2019, 10:25 PM IST

सातारा -रेठरे गावात सायरन वाजवत गाडी आली की आम्हाला ग्रामपंचायतीची कचऱ्याची घंटागाडी आल्यासारखे वाटते. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते यांनी युतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या राज्यमंत्री पदाच्या दर्जाची खिल्ली उडवली. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि कराड दक्षिणमधील उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोहिते बोलत होते.

शरद पवार यांच्यामुळे भोसलेंचा जयवंत शुगर हा खासगी साखर कारखाना मंजूर झाला. पृथ्वीराज बाबांमुळे कृष्णा मेडिकल कॉलेजच्या जागा वाढवून मिळाल्या, असे सांगून मोहिते म्हणाले, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे उपकार विसरणार्‍या कृतघ्न मंडळींना जनता कदापि मते देणार नाही. सायरन वाजवत ते गावात येतात. पण, रेठरेकर त्याकडे लक्ष देत नाहीत. आमच्या गावातील कचर्‍याच्या गाडीसारखाच त्यांच्या सायरनच्या गाडीचा दर्जा आहे, असेही मोहिते म्हणाले.

ज्यांना स्वतःच्या रेठरे गावातील विकासाची चिंता नाही. ते तिसर्‍यांदा निवडणुकीला उभे आहेत. स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांनी कृष्णा कारखान्यासह इतर संस्था उभ्या केल्या. दुर्दैवाने आज या संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत. त्यांनी विकासाच्या सहकार मंदीरांचे पावित्र्य जपण्याऐवजी नष्ट करण्याचे काम केल्याचा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भोसले कुटुंबावर केला. त्यांना निवडून दिल्यास उद्या ते कराडसुद्धा विकतील, असा हल्लाबोलही आमदार चव्हाण यांनी केला.

रेठरे ग्रामस्थांनी आमदार निधीतून विकासकामांसाठी ग्रामपंचायतीकडून लेखी मागणीद्वारे ठराव मागितले होते. मात्र, ग्रामापंचायतीने ठराव देण्यास नकार दिला. ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी आदेश दिला. तरीही भोसले मंडळींनी ग्रामपंचायतीला जाणीवपूर्वक ठराव देऊ दिला नाही. रेठरे गावात सध्या काम सुरू असलेल्या पेयजल योजनेचा मी जागतिक बँकेच्या योजनेत समावेश करून घेतला, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे चव्हाण म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details