महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणावर चालढकल केली तर सरकार राहणार नाही - अण्णा हजारे - चालढकल

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय घटनेच्या आधारे दिला असेल तर तो सरकारला पाळावा लागेल. तो नाकारून चालणार नाही, असेअण्णा हजारे म्हणाले.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

By

Published : Jun 27, 2019, 9:27 PM IST

सातारा- घटनेच्या आधारे न्यायालयाने निर्णय दिला असेल तर तो निर्णय सरकारला मान्य करावाच लागेल. सरकारने चालढकल करुन चालणार नाही. हा लोकशाही देश आहे, असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर व्यक्त केले. ते सातार येथे पत्रकारांशी बोलत होते.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर मत व्यक्त केले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना सर्वोच्च आहे. या घटनेच्या आधारे कायदे होतात. आणि त्याद्वारे देश चालतो. उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय घटनेच्या आधारे दिला असेल, तर तो सरकारला पाळावा लागेल. तो नाकारून चालणार नाही, असेही अण्णा हजारे म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार चालढकल करित आहे काय, यावर ते म्हणाले की सरकार चालढकल करणार तरी किती. जर सरकारने चालढकल केली तर सरकार राहणार नाही. कायमची चालढकल करता येत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details