सातारा - शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (गुरुवारी) सायंकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा भव्य सोहळा डोळ्यात साठवण्याठी शिवसैनिकांची उत्कंठा लागली होती. शिवतीर्थावर 'मी उध्दव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की', असा उच्चार होताच कराडमधील शिवसैनिकांनी कराडच्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि नागरिकांना लाडू वाटप करत जल्लोष केला. भगव्या रंगाची उधळण करून शिवसेनेच्या स्फुर्तीगीतावर ठेकाही धरला.
उध्दव ठाकरेंच्या शपथविधीनंतर कराडमध्ये लाडू वाटप हेही वाचा-कुस्तीपटू बजरंग पूनिया यांना केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडून खेल रत्न पुरस्कार प्रदान
महाराष्ट्राच्या सत्तास्थानी महाविकासआघाडीचे सरकार विराजमान होणार असल्याचे निश्चित झाल्यापासून शपथविधी सोहळ्याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. काल (गुरुवारी) कराडमधील शिवसैनिकांनी दत्त चौकात उध्दव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जल्लोषाची तयारीही केली होती. उध्दव ठाकरे यांचा शपथविधी कराडकरांना पाहता यावा, म्हणून स्क्रीनचीसी सोय करण्यात आली होती.
सायंकाळी शिवतीर्थवर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी उध्दव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की, असा उच्चार होताच शिवसेना पदाधिकारी रामभाऊ रैनाक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. शिवेसेना पदाधिकारी नितीन काशिद, शशिराज कर्पे, सतीश तावरे, साजिद मुजावर, राजेंद्र माने, प्रमोद वेर्णेकर, सुमन कोळी, बापूराव भिसे यांच्यास शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नागरिकांना लाडूचे वाटप केले. शेतकर्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करावे, यासाठी उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही शिवसेना पदाधिकार्यांनी सांगितले.