कराड (सातारा) -पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. आर. औटी यांनी हा निकाल दिला. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपीच्या अल्पवयीन (विधी संघर्ष) मुलाविरूद्ध सातारा येथे खटला सुरू आहे.
अनैतिक संबंधातून हत्या केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा - कराड खून प्रकरण
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. आर. औटी यांनी हा निकाल दिला. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपीच्या अल्पवयीन (विधी संघर्ष) मुलाविरूद्ध सातारा येथे खटला सुरू आहे.
बाळू उर्फ पांडुरंग दादासो पाटील (रा. कापील, ता. कराड) असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी दुसर्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कापील येथील सुरेश पांडुरंग जाधव यांचा 13 ऑगस्ट 2015 रोजी मलकापूर (ता. कराड) येथे कोयता आणि सुर्याच्या सहाय्याने हत्या केली होती. याप्रकरणी मृताचा पुतण्या व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रोहित दिलीप जाधव याने दिलेल्या माहितीवरून कराड शहर पोलिसांनी पांडुरंग दादासो पाटील यास अटक केली होती. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास करून पोलीस निरीक्षक आर. एच. राजमाने यांनी 11 नोव्हेंबर 2015 रोजी कराड जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तसेच सहायक जिल्हा सरकारी वकील अॅड. राजेंद्र शहा यांनी या खटल्याचे काम पाहिले.
सरकार पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रोहित दिलीप जाधव याची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. साक्षीदारांचे जबाब आणि सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपी बाळू उर्फ पांडुरंग दादासाहेब पाटील यास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम मृताच्या पत्नीस द्यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.