सातारा -मलकापूर येथील आगाशिवनगरच्या पोळ वस्तीमध्ये नवीन अपार्टमेंटचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 5 जण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कराड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा या घटनेची नोंद केली गेली.
साताऱ्यातील मलकापूरमध्ये स्लॅब कोसळून अपघात हेही वाचा... नियंत्रण रेषेवर कधीही बिघडू शकते परिस्थिती, आम्ही तयार - लष्करप्रमुख बिपिन रावत
हरेराम कुमार सिंह (30) राहणार राजापूर (बिहार) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. थंकू (21), प्रकाश जंगम (35), संतोष कुमार साळ (20) यांच्यासह दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा... ऑस्ट्रेलिया धगधगतोय; १०० हून अधिक ठिकाणी आगी
मलकापूरच्या आगाशिवनगरमधील पोळ वस्तीत नवीन अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरील स्लॅब काम करणार्या मजुरांच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये हरेराम सिंह याचा स्लॅब अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. थंकू, प्रकाश जंगम, संतोष कुमार साळ यांच्यास अन्य दोघे, असे पाच जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना देण्यात आली. रात्री उशीरा या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात केली गेली.
हेही वाचा... 'थेट सरपंच निवड' होणार रद्द ; विधानसभेत विधेयक बहुमताने मंजूर