महाराष्ट्र

maharashtra

'ना हरकत दाखला' देण्यासाठी १० हजाराची लाच; महिला सरपंचासह तिघांवर गुन्हा

By

Published : Jul 29, 2020, 2:56 PM IST

व्यवसाय सुरू करण्यासाठी'ना हरकत' दाखला मागणाऱ्याकडून १० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी रासाटीच्या (ता. पाटण) सरपंच सुरेखा कदम, ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम आणि बंडू कदम या तिघांवर कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. लाच प्रकरणात तिघांचा समावेश असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पडताळणीत स्पष्ट झाले.

acb registered case on sarpanch and other two
लाच प्रकरणी रासाटीच्या सरपंचासह तिघांवर गुन्हा

कराड (सातारा) -'ना हरकत' दाखला देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रासाटीच्या (ता. पाटण) सरपंच सुरेखा कदम, ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम आणि बंडू कदम या तिघांवर कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीचा ना हरकत हरकत दाखला मागितला होता. दाखला देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रारदाराने मंगळवारी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

सरपंच सुरेखा कदम, ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून १० हजार रूपयांवर तडजोड केली. तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम याने लाचेची रक्कम स्वीकारली. बंडू कदम यांनी लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत स्पष्ट झाल्याने तिघांवर कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार भरत शिंदे, संजय साळुंखे, पोलीस नाईक प्रशांत पाटील, श्रद्धा माने माने, पोलीस कॉन्स्टेबल विशाल खरात, तुषार भोसले, नीलेश येवले, मारुती अडागळे यांनी ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details