महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा महामार्गावर बिअरची वाहतूक करणारा ट्रक पलटला - सातारा बीअर ट्रल पलटली

सातारा जिल्ह्यात बुधवारपासून दारूविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, सातारा महामार्गावर बीअर वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला.

truck carring beer overturned
सातारा महामार्गावर बिअरची वाहतूक करणारा ट्रक पलटला

By

Published : May 14, 2020, 2:29 PM IST

Updated : May 14, 2020, 2:43 PM IST

सातारा - महामार्गावर उडतरे गावानजीक बिअरची वाहतुक करणारा मालट्रक पलटी झाला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. परंतु लाखो रुपयांची बिअर रस्त्यावर वाहून गेली. बुधवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

सातारा महामार्गावर बिअरची वाहतूक करणारा ट्रक पलटला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता साताऱ्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक (क्रमांक एम. एच.११ एएल ५२५०) चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक सेवा रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ट्रकमधील बिअरचे लाखो रुपयांचे बॉक्स व बाटल्या घटनास्थळी पडून मोठे नूकसान झाले आहे. अपघातानंतर भुईंज पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महामार्गावरील वाहतुक सुरुळीत करण्यात आली.
Last Updated : May 14, 2020, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details