महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयनानगरसह पाटण तालुक्याला शनिवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का - कोयनानगर धरण भूकंप

यापुर्वी कोयना परिसरात दि. १ सप्टेंबरला २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तसेच गेल्या दीड महिन्यात कोयनेत भूकंपाचे चार धक्के जाणवले आहेत.

कोयनानगर
कोयनानगर

By

Published : Sep 13, 2020, 3:06 AM IST

कराड (सातारा)- कोयनानगर परिसरात भूकंपाची मालिका कायम असून शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास झालेल्या भूकंपाने कोयनानगरसह पाटण तालुका हादरला. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. दरम्यान, भूकंपामुळे कोयना धरणाला कसलाही धोका पोहचलेला नाही.

कोयनानगर परिसराला शनिवारी रात्री ९.३० मिनिटांनी २.८ रिश्टर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २० कि. मी. अंतरावर वारणा खोऱ्यातील जावळे गावाच्या पश्चिमेला ७ कि. मी. अंतरावर होता. भुकंपाची खोली ८ कि. मी. होती. शनिवारी रात्री झालेल्या भूकंपामुळे कोयना धरणाला धोका पोहोचलेला नाही. धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. यापुर्वी कोयना परिसरात दि. १ सप्टेंबरला २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तसेच गेल्या दीड महिन्यात कोयनेत भूकंपाचे चार धक्के जाणवले आहेत.

हेही वाचा -'मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला'

ABOUT THE AUTHOR

...view details