महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील ९९ जण कोरोना निगेटिव्ह; १३ जण विलगीकरण कक्षात दाखल

एकूण 99 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 13 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

साताऱ्यातील ९९ जण कोरोना निगेटिव्ह; १३ जण विलगीकरण कक्षात दाखल
साताऱ्यातील ९९ जण कोरोना निगेटिव्ह; १३ जण विलगीकरण कक्षात दाखल

By

Published : May 11, 2020, 8:05 PM IST

सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3 आणि वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 96, असे एकूण 99 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 13 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

13 जण विलगीकरण कक्षात दाखल -

शनिवारी (दि. १०) रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details