सातारा:स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील वेगवेगळ्या 3 ठिकाणी कारवाई करत बनावट आणि महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा, 2 इनोव्हा कार आणि एक रिक्षा, असा 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दीपक राजगोंडा पाटील (रा. शिरदवाड, ता. निपाणी, जि. बेळगाव), ललित सुमेरमल काछीया (रा. सुरूर, ता. वाई), तेजस अवघडे, आदित्य हरिश्चंद्र अवघडे, अनुष चिंतामणी पाटील आणि वैभव रवींद्र पावसकर (सर्व रा. सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
3 ठिकाणी कारवाईस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सातारा जिल्ह्यातून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने वाई तालुक्यातील बावधन नाका येथे सापळा रचला होता. पहाटे सहाच्या सुमारास तेथे इनोव्हा कार (क्र. एम. एच. 12 ई. एम. 1883) आली. पोलिसांनी कार थांबवून पाहणी केली असता गाडीत 5 लाख 75 हजार रूपये किंमतीचा गुटखा आढळला. त्यानंतर सुरुर फाटा (ता.वाई) येथे आणखी एका इनोव्हा कारमध्ये (क्र. एम. एच. 01 ए. एम. 4537) गुटखा आढळून आला. सातार्यातील चारभिंती येथे एका रिक्षामध्ये (क्र. एम. एच.11 सी. जे. 2505) 3 जण गुटख्याची वाहतूक करताना आढळले. त्यांनी एका चायनीज सेंटरमध्ये मशीनवर बनावट गुटखा तयार केल्याची कबुली दिली.