सातारा - जिल्ह्यात आणखी 24 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 484 वर पोहोचली आहे. तर फलटण तालुक्यातील होळ येथील 85 वर्षीय वृद्ध महिला ही ‘सारी’ने आजारी होती. तिची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. पण त्याचा अहवाल आला नव्हता. यानंतर 28 मे रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर ती महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
साताऱ्यात आढळले नवीन 24 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 484
सातारा जिल्ह्यात आणखी 24 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 484 वर पोहोचली आहे.
साताऱ्यात पुन्हा आढळले 24 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 484
या 24 बाधित रुग्णांची तालुकानिहाय गावे आणि संख्या पुढीलप्रमाणे -
- फलटण तालुक्यातील वडले 1
- जोरगाव 1
- होळ 1 (मृत वृद्ध महिला),
- साखरवाडी 1
- माण तालुक्यातील म्हसवड 1
- दहीवडी येथील 1
- राणंद 1
- पाटण तालुक्यातील नवारस्ता 1
- जांभेकरवाडी (मरळोशी) 2
- आडदेव 1
- खटाव तालुक्यातील अंभेरी 5
- निमसोड 1
- कलेढोण 2
- सातारा तालुक्यातील निगुडमळा (ग्रामपंचायत परळी) 1
- वाई तालुक्यातील मुंगसेवाडी 2
- जावळी तालुक्यातील आंबेघर 2
Last Updated : May 30, 2020, 2:26 PM IST