सातारा- विधानसभा निवडणुकांपूर्वी रविवारी रात्री कराडच्या कृष्णा कॅनालवरील एका कार्यालयावर छापा मारून फिरत्या पथकाने सव्वा दोन लाखांची रक्कम जप्त केली. कराड उत्तरमधील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे बंधू सत्वशील कदम यांच्या कार्यालयावर छापा मारून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
उमेदवार धैर्यशील कदम यांच्या भावाच्या कार्यालयातून सव्वा दोन लाखांची रक्कम जप्त - vidhansabha election maharashtra
कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जप्त करण्यात आलेली रक्कम ही बांधकाम व्यवसायातील असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जप्त करण्यात आलेली रक्कम ही बांधकाम व्यवसायातील असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.
उमेदवाराचा भाऊ हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्या कार्यालयात मोठी रक्कम असल्याची माहिती फिरत्या गस्त पथकाला मिळाली होती. त्यानुसार गस्त पथकाने छापा मारला. परंतु, तिथे फक्त सव्वा दोन लाखाची रोकड सापडली. ती जप्त करण्यात आली आहे. पैशाबाबत खुलासा करावा, असेही सांगण्यात आले आहे.