कराडमधील १५ जण कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात दिला निरोप - सातारा न्यूज अपडेट्स
आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये कृष्णा रूग्णालयातील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 4, अशा एकूण 15 जणांचा समावेश आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
सातारा - कराडमधील 15 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. यामुळे कराडकरांना मोठा दिलासा मिळाला असून रेड झोनमध्ये असलेल्या सातारा जिल्ह्यासाठी ही दिलासादायक घटना ठरली आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये कृष्णा रूग्णालयातील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 4, अशा एकूण 15 जणांचा समावेश आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, हॉस्पिटलचे डीन डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन कोरोनामुक्तांचे स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
कराडकरांसाठी आनंदवार्ता -
आगाशिवनगर येथील 25, 27 वर्षीय युवक आणि 65 वर्षांचे वृद्ध, वनवासमाची येथील 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय युवक, 13 वर्षांचा मुलगा, मलकापूर येथील 54 वर्षे वयाचा पुरुष, कापील येथील 11 वर्षांचा मुलगा आणि 49 वर्षांचा पुरूष, कामेरी (ता. वाळवा) येथील 48 वर्षीय पुरुष, मिरेवाडी-फलटण येथील 28 वर्षीय युवकाचा कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8, कृष्णा रूग्णालय, कराड येथून 23 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4, असे जिल्ह्यातील एकूण 35 रुग्ण कारोनामुक्त झाले आहेत.