सातारा - 'पोक्सो'च्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला जिल्हा कारागृहात पाठवल्यानंतर तो कोरोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे त्याला अटक करणारा, मेडिकलला घेऊन जाणारा पोलीस अधिकारी, जबाब घेणाऱ्यांसह तब्बल १३ जणांवर होम क्वारंटाईन व्हायची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांनी आता त्यांची इतरत्र क्वारंटाईनची सोय करावी, अशी मागणी केली आहे.
आरोपीला अटक केली अन्... एका अधिकाऱ्यासह १३ कर्मचारी झाले होम क्वारंटाईन - आरोपीला कोरोनाची बाधा
या गुन्ह्यातील एका सहआरोपीला तालुका पोलिसांनी ४ जुलैला जेरबंद केले होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी तसेच इतर सोपस्कार करुन त्या संशयिताला कस्टडीत ठेवण्यात आले. नंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात झाली. मात्र, जिल्हा कारागृहात गेल्यानंतर त्याला कोरोना सदृश्य काही लक्षणं जाणवू लागली. प्रशासनाने त्याची कोरोना चाचणी करुन घेतली.
सातारा तालुका पोलीस ठाण्यात फोक्सो' कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील एका सहआरोपीला तालुका पोलिसांनी ४ जुलैला जेरबंद केले होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी तसेच इतर सोपस्कार करुन त्या संशयिताला कस्टडीत ठेवण्यात आले. नंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात झाली. मात्र, जिल्हा कारागृहात गेल्यानंतर त्याला कोरोना सदृश्य काही लक्षणं जाणवू लागली. प्रशासनाने त्याची कोरोना चाचणी करुन घेतली. अन् तो पाॅझिटिव्ह आला. या वृत्ताने तालुका पोलिसांचे धाबे दणाणले. त्याला अटकेपासून पुढील कारवाईचे सोपस्कार करण्याच्या निमित्ताने त्याच्या सानिध्यात आलेला एक अधिकारी व १२ कर्मचारऱ्यांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले.
मंगळवारपासून हे कर्मचारी घरीच क्वारंटाईन झाले आहेत. मात्र, त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची बाधा होऊ नये, ही शक्यता टाळण्यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांनी क्वारंटाईनची इतरत्र व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. यावर आता पोलीस प्रशासन काय भुमिका घेते, हे लवकरच स्पष्ट होईल.