सातारा - महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या चोवीस तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा सुरवात केली असल्याने, धरणात येणारी पाण्याची आवकही वाढली. धरणातील पाणीसाठ्याने शंभरी गाठली आहे.
राज्यातील वीजेचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला; कोयना धरणात 100.92 टीएमसी पाणीसाठा - कोयणा धरण बातमी
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात आजच्या घडीला 100.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याचेही लक्ष लागून राहिलेल्या कोयना धरणात आवश्यक पाणीसाठा झाल्याने राज्यातील वीज आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासूनच कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाला सुरुवात झाल्याने अवघ्या काही दिवसांतच कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोयना धरणातून सुमारे 56 हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे पाटण, कराड आणि सांगली परिसरात महापुराचा धोका होऊन गतवर्षासारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भिती निर्माण झाली होती. धरणाने शंभर टीएमसीचा टप्पा गाठला आहे. दरम्यान 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.