सांगली- मिरज शहरात एका तरुणाकडून एक रिव्हॉल्व्हर सह दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. भाऊ ऊर्फ असिफ मुल्ला असे या तरुणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.
मिरजेत रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक, 2 जिवंत काडतुसे जप्त - रिव्हॉल्व्हर
मिरज शहरात एका तरुणाकडून एक रिव्हॉल्व्हर सह दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शहरातील ऍपे बेकरी जवळ ही कारवाई केली. भाऊ ऊर्फ असिफ मुल्ला असे या तरुणाचे नाव आहे.
सापळा रचून रिव्हॉलव्हरसह तरुणास अटक..
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला खास बातमीदाराकडून मिरज शहरात एक तरुण रिव्हॉल्व्हर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शहरातील ऍपे बेकरी जवळ सापळा रचला. यावेळी एक संशयित तरुण आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने संशयित भाऊ ऊर्फ असिफ मुल्ला (वय 24) या तरुणास ताब्यात घेत तपासणी केली. त्याच्याकडे एक गावठी बनावटीची रिव्हॉल्व्हर आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आलीत. त्यानंतर पोलिसांनी असिफला अटक करत त्याच्याकडून 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिली आहे.