महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विश्वविक्रमी रांगोळीला सुरुवात, होणार ९ वर्ल्ड बुकमध्ये नोंद - RANGOLI

ही रांगोळी २५० बाय ५५० फूट म्हणजे तब्बल सव्वा लाख स्क्वेअर फुटात साकारण्यात येत आहे. १५ फेब्रुवारीपासून रांगोळी काढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १०० कलाशिक्षक शिवराज्याभिषेक रांगोळी साकारत आहेत.

सांगलीत विश्वविक्रमी रांगोळीला सुरुवात

By

Published : Feb 17, 2019, 7:53 PM IST

सांगली - येत्या शिवजयंतीदिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची विश्‍वविक्रमी रांगोळी साकारण्यात येत आहे. ही महारांगोळी काढण्यासाठी तब्बल १०० कला शिक्षक अहोरात्र झटत असून एकाच वेळी ९ वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या महारांगोळीची नोंद होणार आहे. येत्या १०० तासात ही अद्भुत कलाकृती साकारण्यात येणार आहे.


सांगलीत विश्वविक्रमी रांगोळीला सुरुवात
ही रांगोळी २५० बाय ५५० फूट म्हणजे तब्बल सव्वा लाख स्क्वेर फुटात साकारण्यात येत आहे. १५ फेब्रुवारीपासून रांगोळी काढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळीकर आदमअली मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली १०० कलाशिक्षक शिवराज्याभिषेक रांगोळी साकारत आहेत.

१९ फेब्रुवारीला एकाच वेळी ९ वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या महारांगोळीची नोंद होणार आहे


जवळपास ३० टन रांगोळी आणि विविध रंगांचा वापर करून ही रांगोळी १०० तासात पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे लोकवर्गणीतून हा उपक्रम राबवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व दाखवणार शिवराज्याभिषेक सोहळा जगासमोर एका वेगळ्या पद्धतीने आणण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. १९ फेब्रुवारीला सायंकाळी ही भव्य दिव्य महाविश्वक्रमी रांगोळी पूर्ण होणार असून २५ फेब्रुवारीपर्यंत खुली राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details