महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Widow Tradition Stop : विधवेला'सुवासिनी'करण्याचा ऐतिहासिक निर्णय,"इनामधामणी"चे क्रांतिकारक पाऊल

"विधवा प्रथा बंदी"च्या हेरवाड पॅटर्नच्या पुढचे पाऊल इनामधामणी ग्रामपंचायतीने टाकले आहे.विधवा प्रथा बंदी बरोबर विधवा आणि परितक्त्या महिलांचा पुनर्विवाह करण्याचा ऐतिहासिक ठराव घेण्यात आला आहे,अश्या प्रकारचा निर्णय घेणारी इनाम धामणी हे राज्यातील पाहिले गाव ठरले आहे.

By

Published : May 26, 2022, 6:51 PM IST

छायाचित्र
छायाचित्र

सांगली- "विधवा प्रथा बंदी"च्या हेरवाड पॅटर्नच्या पुढचे पाऊल इनाम धामणी ग्रामपंचायतीने टाकले आहे. विधवा प्रथा बंदी बरोबर विधवा आणि परितक्त्या महिलांचा पुनर्विवाह करण्याचा ऐतिहासिक ठराव घेण्यात आला आहे,अश्या प्रकारचा निर्णय घेणारी इनाम धामणी हे राज्यातील पाहिले गाव ठरले आहे.

विधवेला'सुवासिनी'करण्याचा ऐतिहासिक निर्णय
विधवा महिलांचे पुनर्विवाह करण्याचा ठराव -संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक नवी दिशा देणारा निर्णय कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला आहे.विधवा बंदीचा ठराव ग्रामपंचायतीने घेतल्यानंतर राज्य सरकारकडून प्रत्येक ग्रामपंचायतींना,असे ठराव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आता अनेक ग्रामपंचायतीकडून विधवा बंदीचा ठराव करण्यात येत आहे. मात्र आता याही पुढे जाऊन सांगलीच्या इनाम धामणी गावाने पाऊल टाकले आहे.केवळ विधवा बंदीचा ठराव वर न थांबता, विधवा आणि परित्यक्ता महिलांच्या पुनर्विवाह करण्याचा ठराव देखील इनाम धामणी ग्रामपंचायतीने केला आहे. विधवा महिलांचे पुनर्विवाह करून त्यांच्या पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. तसेच या विवाहासाठी ग्रामपंचायतीकडून संसारोपयोगी साहित्यही भेट देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे.

विधवा महिलांचा होणार पुनर्विवाह -इनाम धामणी ग्रामपंचायतीमध्ये अकरा महिला आणि दोन पुरुष सदस्य आहेत. त्यामुळे महिलांची टीम य गावाचे नेतृत्व करते.शासनाच्या अध्यादेशानुसार गावाने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घ्यायचे ठरवले. मात्र, त्याही पुढे जाऊन महिलांच्या माथ्यावर असणारा विधवेचा कलंक पुसून काढून, पुन्हा त्या महिलेला सुवासिनी करण्यासाठी तिचा पुनर्विवाह करणे आवश्यक असल्याची बाब समोर आली. कारण सरते शेवटी समाजामध्ये महिला सुवासिनी असणे मानाचा समजले जाते. त्यामुळेच सर्व महिलांनी एकजुटीने विधवा महिलांच्या टक्के बरोबर, त्या महिलेचा पुनर्विवाह करून महिलेचे पुनर्वसन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या माध्यमातून केला आहे.

हेरवाडच्या विधवा प्रथेच्या पुढचे पाऊल -पुरोगामी महाराष्ट्रात विधवा महिलांच्या बाबतीत गाव खेड्यात अनेक प्रथा आहेत. आता या प्रथा मोडीत काढण्यासाठी गावागावातून उठाव सुरू झाला आहे. यामध्ये महिलाही अग्रभागी होऊ लागल्या असून त्यातूनच इनाम धामणी गावाने हेरवाड गावच्या निर्णय पुढे जाऊन घेतलेला विधवा महिलांचा पुनर्विवाह करण्याचा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. त्याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा ठरणार आहे. शिवाय महिलांचे पुनर्विवाहाचा ठराव करणारी महाराष्ट्रातील इनाम धामणी ग्रामपंचायत राज्यात पहिलीचं ग्रामपंचायत ठरली आहे.

हेही वाचा -गोळीबार करत दरोडेखोरांनी पळवली एटीएम मशीन, सांगली जिल्ह्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details