सांगली - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यात अवकाळीने नुकसान झालेल्या शेती आणि द्राक्ष बागांची मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पालकमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा
सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या या नुकसानीची जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे. वाळवा गावातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांना भेट देऊन मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला.