सांगली- पिण्याचे पाणी मिळत नसल्याने दुष्काळी जतकर नागरिकांनी तिरडी मोर्चा काढत जत नगरपरिषदेचा निषेध नोंदवला आहे. भाजप नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत पाणी देण्यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुष्काळी जत शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
सांगली : पाण्यासह इतर मागण्यांसाठी दुष्काळग्रस्त नागरिकांचा जत नगरपरिषदेवर तिरडी मोर्चा - water problem
परिषदेच्या कारभाराचा निषेध म्हणून जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत मोर्चा काढण्यात आला. महिलांनी आपल्या खांद्यावर तिरडी घेऊन पालिकेवर धडक देत तातडीने जत शहराला पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली
शहरातील नागरिकांना चार-चार दिवस पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी जत नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी पाणी मिळत नसल्याने नगरपरिषदेला टाळे ठोकून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तरीही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी गुरुवारी जत नगरपालिकेवर मोर्चा काढला.
यावेळी परिषदेच्या कारभाराचा निषेध म्हणून जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत मोर्चा काढण्यात आला. महिलांनी आपल्या खांद्यावर तिरडी घेऊन पालिकेवर धडक देत तातडीने जत शहराला पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी या मोर्चात जतचे आमदार विलासराव जगतापदेखील सहभागी झाले होते.