महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाचन चळवळीकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात; गरजू रुग्णाला मोफत मिळणार प्राणवायू - सांगली जिल्हा लेटेस्ट न्यूज

कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाटेगावातील वाचन चळवळीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासेल त्या रुग्णास मोफत ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वाचन चळवळीकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात
वाचन चळवळीकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात

By

Published : Sep 13, 2020, 10:03 AM IST

सांगली - सध्या शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाटेगावातील वाचन चळवळीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासेल त्या रुग्णास मोफत ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वाचन चळवळीचे संस्थापक राहूल वेदपाठक यांनी दिली.

वाचन चळवळीकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात

कोरोनाच्या महामारीत ऑक्‍सिजनअभावी अनेक लोक मृत्यूमुखी पडत असल्याचे आजूबाजूचे चित्र वेदनादायी आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे लोक कराड, कोल्हापूर, सांगलीचे दवाखाने गाठत आहेत; परंतु गोरगरीब, मध्यमवर्गीय लोकांचे हाल सुरू आहेत. व्हेंटिलेटर, बेड मिळणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे अशा गरजू रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी वाचन चळवळ आणि काही डॉक्टरांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

या उपक्रमासाठी डॉ.शिवलिंग राजमाने, डॉ.प्रशांत माने,डॉ.जयराज पाटील, डॉ.अभिनंदन शेटे,डॉ.प्रताप ठोंबरे,डॉ.विशाल पाटील,डॉ.सुर्याजी लोकरे,डॉ.प्रमोद माने डॉ.विक्रम आडके या वाटेगांवमधील सर्व डॉक्टरांनी सहकार्य केले आहे. वाचन चळवळीचे प्रदीप चव्हाण, एम.आर.पाटील, विजय लोहार, प्रकाश नलवडे, अशिष जाधव हे सर्वजण ऑक्सिजन पुरवठासाठी सर्तक राहणार आहेत. वाचन चळवळीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details