सांगली -शहरपरिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी द्राक्ष आणि इतर पिकांना या अवकाळीचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागात रिमझिम स्वरूपात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा,आंबा तसेच इतर पिकांना फटका बसला आहे. तर सांगली शहरात या अवकाळी पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला.