महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 9, 2022, 5:04 PM IST

ETV Bharat / state

Gangwar In Sangli : सांगलीतील जतमध्ये गॅंगवारमधून दोन तरुणांची हत्या

गॅंगवारमधून दोघा जणांची ( Two Murder In Jat ) हत्या करण्यात आली आहे. जत तालुक्यातील उमदी या ठिकाणी दोन तरुणांची हत्या करण्यात आली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. टोळी युद्धाच्या वर्चस्ववादातून ( Gangwar In Sangli ) हा प्रकार घडला आहे.

Two Murder In Jat
Two Murder In Jat

सांगली -गॅंगवारमधून दोघा जणांचा निर्घूण ( Two Murder In Jat ) हत्या करण्यात आली आहे. जत तालुक्यातील उमदी या ठिकाणी दोन तरुणांची हत्या करण्यात आली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. टोळी युद्धाच्या वर्चस्ववादातून ( Gangwar In Sangli ) हा प्रकार घडला आहे. राजू माळी (23) आणि मदगौडा नाडगौडा बगली (24), असे हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.

टोळी युद्धाचा भडका -

उमदी याठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा संघर्ष सुरू होता. त्यातून धुमसणारा संघर्ष बुधवारी टोकाला गेला. मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात उमदी शहरापासून पंढरपूर रोडवर तुंबळ हाणामारी झाली. ज्यांमध्ये दोन जणांची निर्घूण हत्या करण्यात आली. तलवारीसह धारदार शस्त्रांनी वार करून संतोष राजू माळी आणि मदगौडा नाडगौडा बगली दोघा तरुणांची हत्या करण्यात आली. तर या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे उमदीसह जत तालुका हादरून गेला आहे.

हेही वाचा-BJP Morcha : उद्धवजी, बाळासाहेबांना काय उत्तर द्याल? फडणवीसांचा सवाल; फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांना घेतले ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details