महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विट्याजवळ दोन वाहनांची समोरा-समोर धडक.. भीषण अपघातात पती-पत्नीसह तीन जण जागीच ठार - सांगली अपघात

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे दोन वाहनांमध्ये समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे.

sangli road accident
sangli road accident

By

Published : Dec 24, 2021, 3:01 PM IST

Updated : Dec 24, 2021, 3:12 PM IST

सांगली - दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. विटा शहराजवळील नेवरी येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोन चारचाकी गाड्यांची समोरा-समोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

घटनास्थळावरील दृष्य
भीषण अपघात 3 जण जागीच ठार -
कडेगाव तालुक्यातल्या नेवरी येथे दोन वाहनांमध्ये समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. या भीषण अपघातात तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील दांपत्यासह विट्यातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सुदर्शन गजानन निकम (रा. विटा) आणि कपिल माणिक झांबरे व धनश्री झांबरे (रा.डोंगरसोनी, तासगाव) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

विटा येथील पालिकेचे कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचा मुलगा सुदर्शन निकम आणि संग्राम संजय गायकवाड हे दोघे आज पहाटेच्या सुमारास कडेगाव तालुक्यातील खेराडे गावाकडून विट्याकडे येत होते. तर तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथून कपिल माणिक झांबरे हे पत्नी धनश्री आणि अन्य नातेवाईकांसह तासगावहून पुण्याकडे निघाले होते. दरम्यान नेवरी जवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा -Mumbai Omicron Update : मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ५ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ३६ वर

Last Updated : Dec 24, 2021, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details