सांगली- वाळवा नजीक एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. समोरून येणाऱ्या एका गाडीला चुकवण्याच्या प्रयत्नात ही एसटी बस रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
एसटी बस पलटी होऊन अपघात, दोन विद्यार्थी जखमी - injured
समोरून येणाऱ्या एका गाडीला चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटी झाली.
तासगाव आगारची ही एसटी असून मंगळवारी सकाळच्या सुमारास इस्लामपुरहून तासगावकडे ही एसटी निघाली होती. त्या दरम्यान वाळवा फाटा येथे समोरुन येणाऱ्या मिनी बसला चुकवण्याच्या नादात एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्या शेजारच्या खड्ड्यात शेतामध्ये जाऊन एसटी पलटी झाली. या अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदत कार्य राबवत एसटीमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. देव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून केवळ दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.