महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन तुकड्या कृष्णेत सज्ज

मागील दोन दिवसांपासून कृष्णा पात्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेत सांगलीत एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहे. त्यांनी आज कृष्णा पात्रात प्रात्यक्षिक करत पूर सज्जतेची चाचणी घेतली.

NDRF team
NDRF team

By

Published : Aug 6, 2020, 4:56 PM IST

सांगली- जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पाऊस आणि कृष्णाच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात एनडीआरएफचे दोन तुकड्या दाखल झाले आहे. गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) सांगलीमध्ये या तुकड्यांनी कृष्णेच्या पात्रात प्रात्यक्षिक करत पूर सज्जतेची चाचणी घेतली.

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये याच दिवशी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आला आहे. 14 जुलैपासून एनडीआरएफचे एक पथक सांगली जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यानंतर दुसरे पथकही दाखल झाले आहे. सध्या कृष्णाची वाढती पातळी लक्षात घेता आज सांगलीच्या कृष्णामाई घाटावर या पथकाकडून सराव करण्यात आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या पालिका प्रशासनाच्या बोटींच्या सज्जतेचीही प्रात्यक्षिक पार पडली. या पथकातील जवानांनी कृष्णा नदीच्या पात्राची पाहणी करत खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. 12 जणांची एक तुकडी असून या दोन तुकड्या सज्ज झाल्या आहेत. एक तुकडी सांगलीत तर दुसरी तुकडी वाळवा तालुक्यात सज्ज असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details