सांगली- येथील कृष्णा नदी पात्रात एका प्रेमीयुगुलाने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात प्रियकराचा बुडून मृत्यू झाला आहे. तर प्रेयसी वाचली आहे. शहरातील स्वामी समर्थ घाटावर सकाळी हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे सांगली शहरात मात्र खळबळ उडाली आहे.
कृष्णानदीत प्रेमयुगुलाची उडी; प्रियकराचा बुडून मृत्यू, प्रेयसी बचावली
सांगलीतील स्वामी समर्थ घाटावरील कृष्णा नदीजवळ एक प्रेमीयुगुल आज सकाळी गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्यात वादावादी झाली. यातून दोघांनी नदीत उडी घेतली. यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला असून प्रेयसीला वाचविण्यात येथील नागरिकांना यश आले आहे.
एक प्रियकर आणि प्रेयसी सकाळी स्वामी समर्थ घाटावर आले होते. यावेळी दोघांमध्ये वादावादीचे प्रकार घडला. त्यानंतर या दोघांनीही नदीमध्ये उडी घेतली. यामध्ये प्रियकर पाण्यात बुडाला तर प्रेयसीला त्याठिकाणी असणार्या नागरिकांनी तात्काळ वाचवल्याचने ती बचावली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी अग्निशमन पथकासह दाखल झाले. त्यांनी नदीपात्रामध्ये शोध मोहीम सुरू केली. दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर प्रियकराचा मृतदेह सापडला आहे. या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.